Tuesday, July 20, 2010

तो असा सारा खेळच मांडून जातो
कधी राही तर कधी राधा
तर कधी तुम्ही आणि कधी मी
विठू सावला लेकुरवाला
असतोच  तिथ कुठतरी
अदृश्य की दृश्य संगता येत नाही कुणाला
खेळ संपला तरी उमगतच नाही
त्याचा शेवट कुठला आणि सुरुवात
पण खेळ तर असतोच सारा
मनाचा ,भासाचा किंवा भ्रमाचा

No comments:

Post a Comment